अरुण पाटील आख्खा मसुर आख्ख्या जगात फेमस !!!
पुणे-बेंगलोर महामार्गावरील कामेरी, इस्लामपूरचा हा ढाबा आख्खा मुसूरसाठी प्रसिद्ध नव्हेतर सुप्रसिद्ध आहे.
तस पाहिलं तर आख्खा मसुर ही सर्वसामान्यांची आवडती नव्हे तर पोट भरण्यासाठी गरचेच डाळ यामध्ये मसूरची डाळ सहज मिळते पण तीच पूर्ण रुपात अवतरते आख्खा मसूर मध्ये.
तस पाहिलं तर आख्खा मसूर सर्वत्र मिळतो मात्र या ढाब्यावरील आख्खा मसूरची चवच वेगळी. आजही याची लज्जत चाखण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील मंडळी हमखास या ढाब्यावर नंबर लावून वेटींगला थांबलेले पाहायला मिळतात.
१९८३ मध्ये अरुण पाटील यांनी यांनी हा ढाबा सुरु केला त्यावेळी त्यांनी यास कोणतेही नाव दिले नव्हते. मात्र आख्खा मसुराने त्यांना त्यांचे नाव दिल आणि आजही हा ढाबा त्यांच्याच नावाने ओळखला जातो.
No comments:
Post a Comment