नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात हाहाकार माजवला होता. अनेक प्रकारे प्रयत्न करुनही हा बिबट्या हात लागत नव्हता.
या बिबट्याने ३ डिसेंबर रोजी फुंदेवाडी येथील कल्याण फुंदे यांना ठार केले तर ५ डिसेंबर अजनडोह येथील जयश्री शिंदे यांच्यावर हल्ला करुन त्यांनाही ठार केले तर ७ डिसेंबर रोजी चिखलठार ता. करमाळा येथे ८ वर्षाच्या मुलीवर हल्ला केला होता तसच १४ डिसेंबर पहाटे गाय व वासरावर हल्ला केला होता. या घटनांमुळे करमाळा वासीय भयभीत झाले होते. तसेच या बिबट्याने शेतक-यांच्या अनेक गाई, म्हशी, शेळी, बैल, कुत्रा आदी पाळीव प्रा्ण्यांवर हल्ला करुन ठार केले होते.
वनविभागासह शार्प शूटर, ड्रोन कॅमेरे, डॉग स्क्वाड आदी बिबट्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडत होता. तरीही तो गुंगारा देतच होता. शुक्रवार १९ डिसेंबर २०२० रोजी या बिबटयाला ठार मारण्यात यश आले. वांगी क्रमांक चार येथील राखुंडे यांच्या केळीच्या बागेत असलेल्या बिबट्याला डॉग स्कॉडने ट्रॅप केलेल्या गोळ्या घालून ठार केले.
वन विभागाच्या कर्मचा-यांनी मागील काही दोन दिवसांत सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास केला होता. १६ पथके रात्रं दिवस गस्त करत होते. सहा जणांचा बळी घेऊन बीड, नगर मार्गे करमाळ्या हा बिबट्या दाखल झाला होता.
No comments:
Post a Comment